
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या कथित गर्लफ्रेंडबद्दल गौप्यस्फोट करणारे ज्येष्ठ पत्रकार ग्रिगोरी नेखोरोशेव यांचा मृत्यू झाला आहे. लॅटव्हियाची राजधानी रिगा येथे विषारी मशरूम खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्रिगोरी नेखोरोशेव हे ‘मॉस्कोव्स्की कोरेस्पोंडेंट’ या वृत्तपत्राचे मुख्य संपादक होते.


























































