हे करून पहा – या पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ‘क’ जीवनसत्त्वाचे सेवन वाढवणे. आहारात मोड आलेली कडधान्ये, ताज्या हिरव्या भाज्या आणि संत्री यांचा समावेश करा.

  • नेहमी शुद्ध पाणी पिणे  पावसाळ्यात घरी असो वा बाहेर, नेहमी स्वच्छ आणि शुद्ध पाणीच प्या. बाहेरची थंड पेये पिताना वापरलेले पाणी आणि बर्फ शुद्ध असल्याची खात्री करा. सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतःची पाण्याची बाटली सोबत नेणे केव्हाही उत्तम.

  • प्रोबायोटिक्सचा वापर दही, योगर्ट, ताक आणि घरी बनवलेले लोणचे यांसारख्या प्रोबायोटिकयुक्त पदार्थांचे सेवन वाढवण्यावर भर द्या. यामुळे तुमच्या आतड्यांचे आरोग्य अधिक बळकट होते आणि पोषक घटकांचे शोषण सुधारते.