
पाकिस्तानविरुद्ध सलग 18 सामन्यांपासून अपराजित राहिलेल्या हिंदुस्थानी हॉकी संघाने आता आणखी एक धक्का देण्याची तयारी केली आहे. एफआयएच प्रो-लीगमध्ये शुक्रवारी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा रंगणार असलेल्या महामुकाबल्यापूर्वी हिंदुस्थानी कर्णधार हरमनप्रीत सिंगने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. मागील सामन्यातील किरकोळ चुका सुधारून यावेळी पाकिस्तानवर सुरुवातीपासूनच चढाई करण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे.
मंगळवारी झालेल्या थरारक सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करत वर्चस्व कायम राखले होते. मात्र पाकिस्तानने दिलेल्या झुंजीची दखल घेत हरमनप्रीतने संघाला अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.





























































