व्यावसायिक सिलिंडरवरील निर्बंध शिथिल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या पुरवठय़ावर लादलेले निर्बंध केंद्र सरकारने मागे घेतले आहेत. केंद्रीय पेट्रोलयिम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने आज ही माहिती दिली. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून इराणने तेल वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेली होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून टाकली. त्यामुळे हिंदुस्थानात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून सरकारने उद्योगांना होणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठय़ावर निर्बंध घातले होते. आता युद्ध थांबल्याने व पुरवठा सुरळीत झाल्याने 50 टक्के निर्बंध उठवण्यात आले आहेत.