
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटील यांना आव्हान दिले. या खासदारामध्ये दम असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजप किंवा शिंदेंच्या चेहऱ्यावर पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘हीच मिंधे टोळीची संस्कृती आहे. सहा खासदार मिंधेंच्या टोळीत गेलेत. त्यातील एक पळपुटा सर्वांनाच धमकी देत आहे. हे सर्व भाजपचे नेते आणि पंतप्रधान पाहत आहेत की नाही? पळालेले लोकांना बाकी काहीही दिसत नाही. फक्त स्वतःचा पैसा वाढणार कसा, एवढीच त्यांना काळजी आहे,’ अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.





























































