महेश दीक्षित ‘आयबी’चे नवे प्रमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या गुप्तचर खात्याचे प्रमुख म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी महेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘आयबी’चे नवे संचालक म्हणून ते 1 जुलै रोजी कार्यभार स्वीकारणार आहेत. ते विद्यमान ‘आयबी’ प्रमुख तपन कुमार डेका यांची जागा ते घेणार आहेत.

महेश दीक्षित यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी राहणार असून सरकार त्यांचा कार्यकाळ वाढवू शकते. महेश दीक्षित हे 1993च्या आंध्र प्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत. सध्या ते ‘आयबी’मध्येच विशेष संचालक या पदावर कार्यरत होते. आयबीमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून सह-संचालक तसेच विशेष संचालक या पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. महेश दीक्षित यांची दहशतवादविरोधी मोहिमा तसेच जम्मू-कश्मीरमधील गुप्तचर कारवायांचे तज्ञ म्हणून ओळख आहे.