मध्य, ट्रान्स हार्बरवर आज मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून उद्या रविवारी मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार असून काही गाडय़ा उशिराने धावणार आहेत. मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउैन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी अप, डाउैन धीम्या लोकल जलद मार्गावरून धावतील. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी दरम्यान अप आणि डाउैन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेलकडे जाणाऱ्या अप, डाउन फेऱया रद्द केल्या जातील.