
ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारने व्हेनेझुएलाला मदतीला हात पुढे केला आहे. नुकतेच व्हेनेझुएला देशात भूकंपाचे हादरे बसले आणि त्यांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी नेमार पुढे सरसावला आहे. या भूकंपामध्ये 1400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे आता समोर येत आहे. त्याचबरोबर 3238 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या नैसर्गिक संकटात भूकंपग्रस्तांसाठी नेमारने जवळपास 2 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम दिली आहे. नेमारच्या या मदतीमधून जारो कुटुंबांना अन्न, स्वच्छ पिण्याचे पाणी, तात्पुरता निवारा आणि इतर आपत्कालीन मदतीसह अत्यावश्यक वस्तू पुरवण्यास मदत होईल.


























































