
अयोध्येत सरकारकडून दडपशाही सुरू आहे. राम मंदिर देणगी चोरीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ आज धडकणार होते. ट्रस्टच्या कार्यालयाला घेरावही घालण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना सोमवारी मध्यरात्री नजरकैद करण्यात आले आहे. ही भाजप सरकारची हुकूमशाही आहे. मात्र रामलल्लाचे दर्शन घेतल्याशिवाय परत जाणार नाही, असे राय यांनी ठणकावले.































































