अभिनेत्री क्रिती सनॉनने दिली प्रेमाची कबुली? रिलेशनशिपच्या चर्चांवर सूचक प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री क्रिती सनाॅन आणि उद्योगपती कबीर बहिया एकत्र दिसल्याने, त्यांच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या ब्रेकअपच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र नुकतेच दोघे डिनर डेटनंतर एकत्र बाहेर पडताना दिसले. याचदरम्यान क्रितीने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेले वक्तव्यही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

 

क्रिती आणि कबीर यांना मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले. डिनरनंतर दोघे एकाच कारमधून रवाना झाले. यावेळी क्रिती काळ्या रंगाच्या स्टायलिश पोशाखात दिसली, तर कबीरने पांढरा टी-शर्ट आणि जीन्स असा साधा कॅज्युअल लूक परिधान केला होता. दोघेही एकमेकांशी हसत-गप्पा मारताना दिसल्याने त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना आणखी बळ मिळाले.

 

दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत क्रितीने तिच्या खासगी आयुष्याविषयी स्पष्ट भूमिका मांडली. ती म्हणाली, “मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच सार्वजनिकपणे बोलत नाही. माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते, पण काही गोष्टी स्वतःसाठी राखून ठेवणं मला महत्त्वाचं वाटतं. मी लग्न होईपर्यंत माझ्या रिलेशनशिपबद्दल कोणतीही चर्चा करणार नाही.” असे वृत्त लोकमतने दिले आहे.

 

यासंदर्भात अधिक बोलताना ती म्हणाली, “माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. काही गोष्टी फक्त माझ्या आणि माझ्या जवळच्या व्यक्तींपुरत्याच असतात.” क्रितीचा वाढदिवस २७ जुलै रोजी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ती वाढदिवसानिमित्त सुट्टीसाठी जाणार असल्याचे तिने सांगितले. या ट्रिपबद्दल बोलताना ती म्हणाली की, तिची बहीण नुपूर सनाॅन आणि मेहुणा स्टेबिन नेहमीच तिच्यासोबत असतात. “यंदाही आम्ही चौघे एकत्र जाणार आहोत,” असे ती म्हणाली. तिच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांनी कबीरसोबतच्या नात्याची तिने अप्रत्यक्ष कबुली दिल्याची चर्चा सुरू केली आहे.

 

कबीर बहिया हा युनायटेड किंगडममध्ये व्यवसाय करणारा उद्योजक आहे. तो महेंद्र सिंग धोनी याची पत्नी साक्षी धोनीचा चुलत भाऊ असल्याची माहिती आहे. त्यामुळे तो अनेकदा धोनी आणि भारतीय क्रिकेटपटूंसोबतही पाहायला मिळाला आहे. क्रिती आणि कबीर यांच्यात सुमारे नऊ वर्षांचे वयाचे अंतर असून, कबीर हा क्रितीपेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे.