
संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली. राम मंदिर देणगी घोटाळा, एसआरआरसह देशभरात सुरू असलेल्या राजकीय फोडाफोडीचे पडसाद या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या शिफारशीवरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे पावसाळी अधिवेशन 2026 बोलवण्यास मंजुरी दिली आहे. पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सुमारे चार आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे कामकाज चालेल. या अधिवेशनादरम्यान सरकार अनेक महत्त्वाची विधेयके संमत करून घेण्याची शक्यता आहे. यासोबतच देशातील सार्वजनिक हिताच्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि विषयांवर दोन्ही सभागृहात चर्चा केली जाईल, अशी माहिती रिजिजू यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.
On the recommendation of the Govt of India, Hon’ble President, Smt. Droupadi Murmu ji has approved the summoning of both the Houses of Parliament for the Monsoon Session 2026.
The Session will commence on 20 July, 2026 and continue till 13 August, 2026 for meaningful debate,… pic.twitter.com/TaEYH4F1cK— Kiren Rijiju (@KirenRijiju) July 4, 2026

























































