
पावसाळ्यात घरात जर माश्या फार भिरभिरत असतील तर तुम्ही आजारीदेखील पडू शकता. घरात माश्यांचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करू शकता. पुदिना आणि तुळस या दोघांची पावडर किंवा पेस्ट बनवून पाण्यात मिसळा व हे पाणी माश्यांवर फवारावे.
एका ग्लास दुधात एक चमचा काळी मिरी आणि तीन चमचे साखर मिसळा. जिथे माश्या जास्त फिरतात तिथे हे दूध ठेवा. माश्या त्याकडे आकर्षित होतील, पण लवकरच त्याला चिकटून बुडतील.




























































