भ्रष्टाचार हे भाजप आणि मिंधेंचे पहिले नाव, मिसिंग लिंक दुर्घटनेवरून आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ पहिल्याच पावसात दरड कोसळल्याच्या घटनेवरून सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. रस्ते असो वा मंदिरे, भ्रष्टाचार हे भाजप आणि मिंधे यांचे पहिले नाव आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर फटकारले.

 

मिसिंग लिंकचा महायुती सरकारने मोठा गाजावाजा केला होता. त्याच मिसिंग लिंकजवळ दोन महिन्यांतच दरड कोसळली. वाहतूक विस्कळीत होऊन हजारो लोकांना मनस्ताप झाला. त्याबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.

 

मिसिंग लिंकचे उद्घाटन १ मे २०२६ रोजी करण्यात आले होते. त्याला दोन महिने होत नाही तोच तिथे दरड कोसळणे आणि बरेच काही घडले आहे. पुण्याला जाताना आणि परत येताना याचा वापर आपण केला तेव्हा लक्षात आले की या रस्त्याचा ५० फूट भागही सपाट नाही, संपूर्ण चढ-उतार आहे. त्यावरून प्रवास करताना एखाद्या बोटीत बसून लाटांवरून प्रवास करतोय की काय असा भास होतो, असे आदित्य ठाकरे यांनी | ट्विटमध्ये म्हटले आहे.