
मंडणगडमध्ये सलग पाच दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मंडणगड भिंगळोली येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील आवारासाठी उभारण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळली आहे. मंडणगड तालुक्यातील गावागावात नुकसान झाले आहे. या सर्वच पडझडीच्या घटनांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून सुरू आहेत.
अनेक ठिकाणी महावितरण कंपनीचे पोल पडून नुकसान झाले आहे. मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूणच्या अखत्यारितील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील आवाराच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळली आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.


























































