
निरोगी राहण्यासाठी केवळ पौष्टिक गोष्टी खाणे पुरेसे नाही तर, योग्य पद्धतीने स्वयंपाक बनवणे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते. अनेकदा आपण चांगल्या दर्जाचे साहित्य वापरतो, पण स्वयंपाक करताना नकळत केलेल्या छोट्या चुकांमुळे अन्नातील पोषक तत्वांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच स्वयंपाकघरात पाळल्या जाणाऱ्या योग्य सवयी देखील संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
- किचनमधील कोणत्या ५ चुका टाळणे आवश्यक आहे
भाज्या गरजेपेक्षा जास्त शिजवणे
भाज्या खूप वेळ किंवा जास्त आचेवर शिजवल्याने त्यातील काही विटामिन्स, विशेषतः विटामिन ‘सी’ आणि काही विटामिन ‘बी’ कमी होऊ शकतात. त्यामुळे भाज्या गरजेनुसारच शिजवाव्यात, जेणेकरून त्यांची चव, रंग आणि पोषण टिकून राहील.
एकाच तेलाचा वारंवार वापर करणे
एकदा वापरलेले तेल वारंवार गरम करून वापरल्याने त्यात हानिकारक घटक तयार होऊ शकतात. यामुळे अन्नाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा पुन्हा गरम करणे टाळणेच उत्तम.
गरजेपेक्षा जास्त मीठ आणि मसाले वापरणे
जेवणात जास्त मीठ आणि मसाल्यांचा वापर केल्याने चव वाढू शकते, परंतु त्याचे जास्त प्रमाण आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. संतुलित प्रमाणात मीठ आणि मसाले टाकल्याने जेवण चवदार होते.
भाज्या कापून दीर्घकाळ उघडे ठेवणे
भाज्या कापल्यानंतर दीर्घकाळ उघड्या ठेवल्यास त्यांचा ताजेपणा आणि काही पोषक तत्वांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरजेच्या वेळीच भाज्या कापून लवकरात लवकर वापरणे योग्य ठरते.
अन्नपदार्थ चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवा
फळे, भाज्या, डाळी आणि मसाले योग्य तापमानात आणि स्वच्छ, सुक्या ठिकाणी साठवणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास त्यात ओलावा येऊ शकतो, ज्यामुळे त्यांची गुणवत्ता आणि ताजेपणा कमी होते.
कोणत्या चांगल्या सवयी जेवणाला हेल्दी बनवू शकतात?
- स्वयंपाक करण्यापूर्वी आणि नंतर हात व्यवस्थित धुवावेत, तसेच स्वयंपाकघर आणि भांडी स्वच्छ ठेवावीत.
- ताजे आणि चांगल्या दर्जाचे अन्नधान्य व साहित्य वापरावे.
- भाज्या चांगल्या धुवून मगच कापाव्यात आणि गरजेनुसार शिजवाव्यात.
- तळण्याऐवजी अन्न उकळणे, वाफेवर शिजवणे किंवा कमी तेलात शिजवणे हे उत्तम पर्याय ठरू शकतात.
- आहारात संपूर्ण धान्य, डाळी, हिरव्या भाज्या आणि हंगामी फळांचा समावेश करावा.
स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी
- जास्त प्रमाणात तेल, मीठ आणि साखर वापरणे टाळावे.
- जेवण जास्त शिजवू नये आणि योग्य तापमानावर तयार करावे.
- कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ वेगवेगळे ठेवावेत, जेणेकरून संसर्गाचा धोका कमी होईल.
- संतुलित आहारासाठी जेवणात प्रोटीन, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असलेल्या गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.





























































