लखनौत विमानाला पक्षी धडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ लँडिंग करताना विमानाला पक्षी धडकला. पायलटने प्रसंगावधान राखून विमानाची सुरक्षित लँडिंग केली. विमानातील सर्व 163 प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षित उतरवण्यात आले. खराब हवामानामुळे विमान जवळपास 38 मिनिटे उशिरा होते.