
दापोली शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यातूनच खड्डे तुडवत प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून रस्ता वाहतूक योग्य होण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने पाऊले उचलली पाहिजेत अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
दापोली शहरातील सेवा निकेतन हॉस्पिटल जवळील मनवा हेरिटेज फॅमिली माळ येथील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हा मार्ग सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असा मार्ग आहे. अशा मार्गावर हॉस्पिटल, मेडिकल, पतसंस्था, हार्डवेअर दुकाने, मशीन मॅकेनिक आदी विविध प्रकारच्या आस्थापनांकडे जाणारा असा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर कायमच वर्दळ असते. अशा या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील सुरळीत वाहतुकीसाठी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून नगर पंचायत प्रशासनाने रस्ता वाहतूक योग्य करावा या मागणीने जोर धरला आहे.





























































