वृक्षारोपण करणाऱ्या 40 विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगाशिव डोंगरावर वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांच्या थव्याने हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी झालेल्या पळापळीत सुमारे 40 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींवर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे विद्यार्थी मलकापूरच्या श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळ शाळेचे आहेत.