
अंधेरी पूर्व येथील एका हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती महिला एकासोबत हॉटेलमध्ये आली होती. आज पहाटे तिला रक्ताची उलटी झाल्याने ती बेशुद्ध झाली. तिच्यासोबत असलेला एकजण गँगरीनच्या उपचारासाठी जात आहे असे सांगून हॉटेलबाहेर पडला.
काही तासानी तो हॉटेलमध्ये परतला. त्यानंतर हॉटेलमधील स्वच्छता कर्मचाऱ्या ला ती महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली. हॉटेलच्या कर्मचाऱ्याने याची माहिती अंधेरी पोलिसांना दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली असता तिला मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर काही बाबींचा उलगडा होणार आहे.





























































