
राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, बी.एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या, बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या, बी.एफ.एस्सी. मत्स्य विज्ञान, बी. टेक. कृषी अभियांत्रिकी, बी. टेक. अन्न तंत्रज्ञान, बी.एस्सी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान, बी.टेक. जैवतंत्रज्ञान बीएससी (ऑनर्स), कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ पदवी व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस 10 जुलै 2026 पासून सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख 25 जुलै आहे.
राज्यातील चार कृषी विद्यापीठांतर्गत नऊ विद्याशाखेमध्ये हे चार वर्षांचे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात. राज्यात 195 कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता 17 हजार 586 आहे. एमएचटी-सीईटी 2026 तसेच संबंधित अभ्यासक्रमांसाठी विहित इतर राष्ट्रीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण/पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावरील संबंधित लिंकद्वारे दिलेल्या मुदतीत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे स्पॅन करून अपलोड करणे बंधनकारक राहील, असे सीईटी कक्षाकडून कळवण्यात आले आहे.





























































