
दिव्यातील बेतवडे गावातील जवळपास ४० शेतकऱ्यांनी भूमाफियांच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड या कंपनीच्या बांधकाम व्यावसायिकांनी जमीन विकास करारात ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला दिला नाही. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीवर इमारती बांधून त्यांची विक्री करतानाच शेतकऱ्यांना केवळ खोटी आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल केल्याने शेतकरी संतापले आहेत. या अन्यायाविरोधात शिवसेनेने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
बेतवडे गावातील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी शुक्रवारपासून मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड बिल्डरच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आपल्या हक्काच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यात दाद मागावी लागत आहे, परंतु तिथेही पोलीस प्रशासन बिल्डरांना पाठीशी घालत असून शेतकऱ्यांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
भूमिपुत्रांच्या लढ्याला शिवसेनेचा पाठिंबा
मैराथीन कंपनीचे भू-माफिया मथुर रमणीकलाल शहा, सागर गाला व भागीदार यांचावर बेतवडे नील शेत गुन्हा
या फसवणूक या मागण मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड या कंपनीच्या मयूर शहा, सागर गाला व त्यांच्या भागीदारांनी गेल्या १० वर्षांपासून चालवलेली फसवणूक संतापजनक असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे यांनी केला. यावेळी शहरप्रमुख सचिन पाटील, विभागप्रमुख मिलिंद गवई, नितेश इंगोले, गणेश पवार, देवेंद्र कांबळे, रुपेश कांबळे, नितीन अहिरे, राहुल जोगदंड, अमोल केंट्रेंसह पदाधिकारी उपस्थित होते. भूमिपुत्रांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. या परप्रांतीय मुजोर भूमाफिया बिल्डरांच्या मुसक्या आवळल्याशिवाय शांत बसणार नाही, असे अॅड. रोहिदास मुंडे यांनी सांगितले.





























































