Pandharpur News – शहरात मांस, मटण विक्रीस मनाई; 15 ते 29 जुलै या कालावधीत बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pandharpur-chandrabhaga-river-security-lifeguards-recommendation-sachin-ithape

आषाढी शुध्द एकादशी सोहळा 25 जुलै रोजी असून यात्रा कालावधी 15 जुलै ते 29 जुलै असा आहे. या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या कालावधीत पंढरपूर शहरात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी 15 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्रीवर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी बंदी आदेश जारी केले आहेत. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी श्री इथापे यांनी सदर आदेश जारी केले आहेत.

आषाढी यात्रेसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून मानाच्या व महत्त्वाच्या पालख्या करकंब (ता.पंढरपूर) येथे मुक्काम करीत असतात. या ठिकाणी लाखो भाविक करकंबसह आसपासच्या गावात मुक्कामास असतात. विविध सामाजिक व राजकीय संघटनाकडून तसेच भाविकांकडून मांस, मटण विक्रीस बंदी घालावी, अशी मागणी होती. त्या अनुषंगाने करकंब व पांढरेवाडी, व्होळे, देवडे, खेडभोसे येथे दिनांक 20 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.