राम मंदिर देणगी घोटाळा, आठही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणात अटकेत असलेल्या आठ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या प्रकरणातील अटकेत असलेल्या सर्व ८ आरोपींची कोठडी संपत आल्याने न्यायालयासमोर पुढील कार्यवाही पार पडली. सुनावणीनंतर न्यायालयाने या आठही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या आरोपींचा मुक्काम आता आणखी काही दिवस तुरुंगातच राहणार असून, तपासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

दरम्यान, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांमध्ये गैरव्यवहार आणि चोरी झाल्याचे आरोप झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली असून सध्या त्यांच्याकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. विशेष म्हणजे नुकतेच सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेत यूपी एसआयटीकडून तपासाच्या सद्यस्थितीचा अहवाल मागवला आहे. त्या पाठोपाठ आता आरोपींच्या कोठडीत वाढ झाल्याने तपासाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.