Dapoli News – दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर सायकल वारी पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दापोली सायकलिंग क्लबच्या सायकलप्रेमींनी दापोली–चिपळूण–पंढरपूर असा ३०० हून अधिक किलोमीटरचा प्रवास सायकलवरून यशस्वीरीत्या पूर्ण केला. आलेकर बंधू, चिपळूण यांच्या वतीने आयोजित सायकल वारीत दापोलीचे सुनिल रिसबूड, राजेंद्र नाचरे, प्रशांत पालवणकर, निनाद देवरुखकर, मंदार वझे, शौरी संदीप राणे व सुनिल शिंदे सहभागी झाले. तर अंबरीश गुरव आणि प्रणव उनकुले यांनी पुणे–पंढरपूर मार्गावरून सायकल वारी पूर्ण केली.

या उपक्रमातून आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सायकल वापराचा संदेश देण्यात आला. वारीदरम्यान विविध ठिकाणी ग्रामस्थांनी सायकलस्वारांचे स्वागत केले. सायकलवरून पंढरीची वारी पूर्ण केल्याबद्दल सहभागींचे सर्वत्र कौतुक होत आहे.