Ratnagiri news – लांजात भीषण अपघात; उभ्या डंपरला कारची जोरदार धडक, मुंबईतील तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लांजा शासकीय विश्रामगृहाबाहेर उभ्या असलेल्या डंपरला मागून येणाऱ्या भरधाव क्रेटा कारने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील कुटुंब क्रेटा कारने गोव्याहून मुंबईकडे निघाले होते. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास लांजा शासकीय विश्रामगृहाबाहेर उभ्या डंपरला अनियंत्रित झालेल्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा पार चेंदामेंदा झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा आणि एका मुलाचा समावेश आहे.