
ऑनलाईन शॉपिंग करताना मागवलेले बूट वेगळेच आल्यामुळे ते परत केल्यानंतर पैसे परत न केल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस’ला दणका दिला आहे. न्यायालयाने ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल आणि न्यायालयीन खर्चापोटी ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेसला एकूण १२,००० रुपयांचा दंड ठोठावला असून बुटांचे पैसेही परत करण्याचे आदेश दिले आहेत.































































