
अयोध्येतील श्रीराम मंदिरात देणगी चोरीवरुन देशभरात संताप व्यक्त करण्यात येत असतानाच गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातदेखील दान चोरीची घटना उघडकीस आली आहे. दानपेटीतल रक्कम मोजणारा कर्मचारी नोटांचे बंडल लपवतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फुटेज दोन महिन्यांपूर्वीचे आहे. यात आउटसार्ंसग कर्मचारी नोटांचे एक बंडल आपल्या पायांखाली लपवताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चिराग ठाकोरसह तीन कर्मचायांना अटक केली होती. मंदिर ट्रस्टने त्यांच्या सेवा समाप्त केल्या आहेत.































































