
होर्मुझ सामुद्रधुनीत सोमवारी व्यापारी जहाजावरील हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या पुण्यातील मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली असून, हेरंब यांचे सासरे ऋषी टंडन यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हेरंब करमरकर हे संबंधित जहाजावर थर्ड इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. जहाजावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना ‘खाडी सुरक्षित पार केली’ असा शेवटचा संदेश पाठवला होता. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता.





























































