पान व्यापारी महासंघाचा मोर्चा मुंबईवर धडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पान व्यापारी महासंघाचा मोर्चा मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर धडकला. या मोर्चात राज्यभरातील सात लाखांहून अधिक पान विव्रेत्यांचे प्रतिनिधित्व करण्यात आले. पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व प्रवत्ते अजित सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या मोर्च्यात राज्यातील विविध जिह्यांमधील शेकडो व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. छोट्या व्यापाऱ्यांविरोधात आयपीसी कलम 328 व ‘मकोका’च्या कथित गैरवापराविरोधात हे आंदोलन छेडण्यात आले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून न्याय आणि सामान कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हा लढा पुढेही असाच सुरू राहणार असल्याचे यावेळी महासंघाने स्पष्ट केले आहे.