ट्रेंड – आईसाठी व्याकूळ लेकरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉस्टेलमधील मुलांचे जग फार खडतर असते. जेव्हा एखादं मुलं आपल्या आईपासून दूर हॉस्टेलमध्ये राहायला जाते तेव्हा त्याला सतत घराची आठवण येते आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लेकरू आपल्या आईला हॉस्टेलमधून फोन करत आहे. आईशी हितगुज साधताना तो भावनाविवश होऊन रडतोय. इन्स्टाग्रामवर ‘daywithaviip’ या पेजवरून हा व्हिडीओ व्हायरल झालाय, जो बघून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. या व्हिडीओला आतापर्यंत कोटय़वधी ह्यूज मिळाले असून 11.4 दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. काही नेटिझन्सनी ‘पालकांनी आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नये’, असे मत व्यक्त केले आहे.