कॉमेडियन समय रैनाला तीन लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिव्यांगांवर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवरून सर्वोच्च न्यायालयाने आज स्टँड-अप कॉमेडियन समय रैना, रणवीर अलाहाबादिया, विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर, निशांत तंवर यांच्यावर तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमल्या बागची आणि न्या. व्ही. मोहन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.