महायुतीचे काम तकलादू; बुलेट ट्रेनच्या कामासाठी उल्हास नदीवर बांधलेला पूल वाहून गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुतीच्या आणखी एका तकलादू कामाचे बिंग फुटले. गेल्या आठवडय़ात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दिवा येथे उल्हास नदीवर बुलेट ट्रेनच्या कामासाठी उभारलेला पूल वाहून गेल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत  कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा पूल वाहून गेल्यामुळे मुख्य कामाच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. उल्हास नदीपात्रात दिवा येथे मुख्य पोल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. तेथे लोखंडी गर्डर, पिलर्स, काँक्रीट यासह विविध प्रकारची साधनसामग्री पोहोचवण्यासाठी हा स्वतंत्र तात्पुरता पूल उभारण्यात आला होता.