
स्पेनने चेंडूवर पकड मिळवत पासांची मालिका सुरू केली आणि प्रत्येक अचूक पासवर संपूर्ण स्टेडियम ‘ओले… ओले…’च्या घोषणांनी दणाणून गेले. फ्रेंच चाहत्यांनी सुरुवातीला शिट्ट्या मारून उत्तर दिले, पण स्पेनचा दबदबा वाढताच त्यांचा आवाज मंदावला. अखेर शेवटच्या शिट्टीपर्यंत स्पॅनिश चाहत्यांची लय आणि जल्लोष कायम राहिला.
एम्बाप्पेच्या एका स्पर्शावर हजारो पॅमेरे
किलियन एम्बाप्पेने चेंडूला स्पर्श केला की हजारो मोबाईल कॅमेरे एकाच वेळी सुरू होत होते. त्याच्या प्रत्येक ड्रिबलला, प्रत्येक धावेला चाहत्यांनी उभे राहून दाद दिली. गोल झाला नाही तरी एम्बाप्पे हा त्या रात्रीचा सर्वाधिक छायाचित्रित खेळाडू ठरला.
ढोल, ट्रम्पेट आणि स्पॅनिश जल्लोष
स्टेडियमबाहेर स्पेनच्या चाहत्यांनी ढोल, ट्रम्पेट आणि पारंपरिक गाण्यांनी वातावरण रंगवले. प्रत्येक चौकात नाच, गाणी आणि झेंडय़ांची लयबद्ध मिरवणूक सुरू होती. फुटबॉलच्या विजयाचा उत्सव संपूर्ण शहरात पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सेल्फीत हरले वैर
अंतिम शिट्टीनंतर पराभूत फ्रेंच आणि विजयी स्पॅनिश चाहते एकमेकांसोबत पह्टो काढताना दिसले. काहींनी जर्सींची देवाणघेवाण केली, तर अनेकांनी ‘फुटबॉल फर्स्ट’ म्हणत हस्तांदोलन केले. मैदानावरील कट्टर स्पर्धा गॅलरीबाहेर मैत्रीत बदलली.
चेहऱयावर रंग, डोळय़ांत भावना
दोन्ही देशांच्या चाहत्यांनी चेहऱ्यावर राष्ट्रीय ध्वज रंगवले होते. सामना जसजसा रंगत गेला तसतसे चेहऱयावरील हसू, तणाव, निराशा आणि आनंदाचे भाव बदलत होते. एका स्टॅण्डमध्ये तर पॅमेऱयांनी भावनांचा जिवंत कोलाजच टिपला.
मेट्रोतही स्पेनचा विजय सोहळा
सामना संपताच मेट्रो स्थानके, रस्ते आणि चौक स्पॅनिश चाहत्यांनी गजबजून गेले. ‘व्हिवा एस्पाना’च्या घोषणा, झेंडे आणि गाण्यांनी शहर मध्यरात्रीपर्यंत जागे ठेवले. प्रवाशांनीही टाळय़ांच्या गजरात त्यांना साथ दिली.
व्हीआयपी बॉक्सपेक्षा गॅलरी भारी
व्हीआयपी बॉक्समध्ये अनेक दिग्गज उपस्थित असले तरी खऱया अर्थाने सामना रंगवला तो सामान्य चाहत्यांनी. त्यांच्या अखंड घोषणांनी, गाण्यांनी आणि रंगीबेरंगी कोरिओग्राफीने संपूर्ण वातावरण विद्युतमय केले.
































































