
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी चोरीचा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय बनलेला असताना, आता गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिराच्या तिजोरीतून झालेल्या चोरीचे एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. हे फुटेज दोन महिन्यांपूर्वीचे आहे. यात आउटसोर्सिंग (Outsourcing) कर्मचारी नोटांचे एक बंडल आपल्या पायांखाली लपवताना दिसत आहे.































































