वांगचुक यांची प्रकृती खालावली, हायकोर्टाची सरकारला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sonam-wangchuk-health-deteriorates-delhi-high-court-notice-to-centre-over-hunger-strike-updates

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 17 दिवसांपासून उपोषण करणारे शिक्षणतज्ञ व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व दिल्ली सरकारला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

वांगचुक यांचे उपोषण असेच सुरू राहिल्यास पुढच्या दोन दिवसांत त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचाराचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका एका वकिलाने केली होती. त्यावर न्यायालयाने दोन्ही सरकारला नोटीस बजावली. पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.