
पंढरपूर कॉरिडॉर करताना बाधितांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉर करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, बाधितांना विश्वासात न घेताच कॉरिडॉर करण्याचे नियोजन केले जात असून, मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केल्याची भावना बाधित कुटुंबांमध्ये निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर पांडुरंगाच्या महापूजेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून आणि दुकाने बंद ठेवून स्वागत करणार असल्याचे कॉरिडॉरबाधितांचे नेते बाबाराव महाजन बडवे यांनी जाहीर केले. श्री विठ्ठल मंदिराजवळ बाधित कुटुंबांची आज बैठक पार पडली. या बैठकीला बाधित व्यापारी व बाधित कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉरिडॉर आराखडा करताना विश्वासात घेण्याचा शब्द दिला होता तो त्यांनी पाळला नाही, अशी नाराजी व्यक्त केली.
































































