
महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचलेला खाद्यतेल ब्रॅण्ड ‘जेमिनी’ पंपनीच्या चार व्हॅन आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीमध्ये सहभागी झाल्या आहेत. वारकऱयांचा वारीचा प्रवास अधिक सुकर आणि सुखकर व्हावा यासाठी पंपनीतर्फे विविध सेवाभावी उपक्रम राबवले जात आहेत.
पुणे येथून रवाना झालेल्या ‘जेमिनी सेवा व्हॅन’च्या माध्यमातून वारकऱयांसाठी मोबाईल चार्ंजग स्टेशनची विशेष सोय करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये प्रवासादरम्यान वारकऱयांचे साहित्य आणि मौल्यवान वस्तूंचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी एक लाख पारदर्शक पाऊच, पॉकेट आरती आणि स्मृतिचिन्ह म्हणून की चेनचे वाटप करण्यात येत आहे. याशिवाय यात्रेदरम्यान वारकऱयांना फराळ वाटप करणाऱया रेस्टॉरंट भागीदारांना ‘जेमिनी’कडून शेंगदाणा तेल पुरवले जाणार आहे. यात्रेकरू वारकऱयांचा प्रवास अधिक सुखकर करणे हाच आमचा प्रयत्न असल्याची माहिती कारगील फूड्स साऊथ एशियाचे गो-टू-मार्पेट रिटेल विभागाचे वरिष्ठ संचालक शैलेश खुराना यांनी दिली.





























































