
शुक्रवारी अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या चाबहार बंदरातील एक देखरेखीसाठीचा टॉवर कोसळल्याचे दिसून आले आहे. हे बंदर अफगाणिस्तानसाठी महत्त्वाचा व्यापारी मार्ग असल्याचे मानले जाते.
https://t.co/jZlSVRePRC pic.twitter.com/Nj5o0oiphH
— Pete Hegseth (@PeteHegseth) July 17, 2026
अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी हा देखरेखीसाठीचा टॉवर कोसळताना दिसत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले. हेगसेथ यांनी ते छायाचित्र शेअर करण्यापूर्वीच ते सोशल मीडियावर काही युझर्सनी प्रसारित केले होते.
चाबहार बंदर यापूर्वीही अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांचे वारंवार लक्ष्य ठरले आहे. या बंदरावर तिसऱ्यांदा हवाई हल्ले झाल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली, मात्र टॉवर कोसळल्याच्या संदर्भातील उल्लेख त्यांनी केला नाही.
हा टॉवर बंदरातील व्यापारी जहाजांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी असल्याचे सांगितले. इराणची रिव्होल्युशनरी गार्ड संघटनाही देशातील विविध बंदरांवर कार्यरत आहे, असे पीटीआयच्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

























































