
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि उपोषणस्थळावरून हटवले. पोलिसांनी त्यांनी सफरदगंज रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली आहे. यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांच्यावर एका महिलेने शाई फेकल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोनम वांगचुक यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर उपोषणाला बसलेल्या अभिजीत दिपके यांच्यावर महिलेने शाई फेकली; कानाखाली मारण्याचाही प्रयत्न, जंतरमंतरवर गोंधळाचे वातावरण pic.twitter.com/En1OPErEm0
— Saamana Online (@SaamanaOnline) July 18, 2026
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आपल्यालाही मारहाण करत नजरकैद केल्याचा आरोप अभिजीत दीपके यांनी केला. वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटवल्यानंतर अभिजीत दीपके आमरण उपोषणाला बसले. यावेळी दीपके उपस्थित आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना एका महिलेने अचानक त्यांच्यावर शाई फेकली. एवढेच नाही तर कानाखाली मारण्याचाही प्रयत्न केला.
आपलं म्हणणं रेटून नेणं म्हणजे सरकार चालवणे नाही, याला हुकुमशाही म्हणतात; उद्धव ठाकरे कडाडले
आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या आंदोलकांनी सदर महिलेला रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्याक कैद झाला असून याचा व्हिडीओ दीपके यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला असून ‘निळा माझा आवडता रंग आहे’, असे कॅप्शन दिले आहे.
Blue is my colour… Jai Bhim! pic.twitter.com/SItr64em29
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 18, 2026





























































