
पेरू हे फळ केवळ आपल्या जिभेच्या चवीसाठी उपयुक्त नाही तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच पेरू सोबत त्याच्या पानांचे देखील खूप सारे आरोग्यवर्धक फायदे आहेत. उत्तम आरोग्यासाठी पेरू हे फळ जितके महत्त्वाचे आहेत. तितकीच त्या फळाची पाने देखील महत्त्वाची आहेत.
पेरू हे पौष्टिक फळ म्हणून ओळखले जाते. मात्र, त्याची पानेही औषधी गुणधर्मांनी समृद्ध असल्याचे मानले जाते. पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉइड्स, पॉलीफेनॉल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. आयुर्वेदातही या पानांचा विविध कारणांसाठी वापर केला जातो.
पेरूच्या पानांचा वापर कसा करावा?
हर्बल चहा
८ ते १० ताजी पाने दोन कप पाण्यात १० मिनिटे उकळून गाळून प्यायल्यास हर्बल चहा तयार होतो. चवीनुसार मध किंवा लिंबू घालू शकता.
माउथ रिन्स – पाने उकळून तयार झालेले पाणी थंड करून त्याने गुळण्या केल्यास तोंडाची स्वच्छता राखण्यास मदत होऊ शकते.
केस धुण्यासाठी – पानांचे उकळलेले पाणी थंड करून केस धुतल्यानंतर शेवटी त्याने केस धुतल्यास टाळू स्वच्छ राहण्यास मदत होऊ शकते.
फेस पॅक – पानांची पेस्ट करून त्यात गुलाबजल मिसळा आणि १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्वचेसाठी हा घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतो.
पेरूच्या पानांचे संभाव्य फायदे
पचन सुधारण्यास मदत
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास सहाय्य
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
अँटीऑक्सिडंट्समुळे पेशींचे संरक्षण




























































