केळीची साल फेकू नका! घरातील कामांसाठी अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वजन कमी असणाऱ्यांसाठी आहारामध्ये केळीचा समावेश हा फार महत्त्वाचा मानला जातो. वजन कमी असल्यावर केळी खाण्यामुळे अनेक फायदे मिळतात. खासकरून वजन वाढते, तसेच शरीराला देखील विविध पोषक तत्वे मिळतात. म्हणूनच वजन वाढवण्याकरता केळी खाण्याकडे अनेकांचा कल असतो. केळी आपल्या आरोग्यासाठी अनेक पोषक तत्वे पुरवतात. परंतु केवळ केळीच नाही तर केळीची साल देखील तितकीच गुणकारी मानली जाते.

केळी खाल्ल्यानंतर बहुतांश लोक त्याची साल कचऱ्यात फेकून देतात. मात्र, हीच केळीची साल अनेक घरगुती कामांसाठी उपयुक्त ठरू शकते. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे ती केवळ रोपांसाठीच नव्हे, तर घरातील स्वच्छता आणि काही सौंदर्यविषयक उपयोगांसाठीही वापरली जाते.

केळीच्या सालीचे उपयोग

केळीच्या सालीचा आतील भाग झाडांच्या पानांवर हलक्या हाताने चोळल्यास त्यावरील धूळ निघून जाते आणि पाने अधिक स्वच्छ व चमकदार दिसतात.

केळीच्या सालीचा आतील भाग १ ते २ मिनिटे दातांवर हलक्या हाताने चोळल्यास काही प्रमाणात डाग कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, हा उपाय दंतचिकित्सकांच्या उपचारांचा पर्याय नाही.

चामड्याचे बूट, बेल्ट किंवा बॅगवर सालीचा आतील भाग चोळून नंतर मऊ कापडाने पुसल्यास त्यांची चमक सुधारण्यास मदत होते.

केळीच्या सालीने चांदीची भांडी किंवा दागिने हलक्या हाताने घासून नंतर स्वच्छ धुतल्यास त्यावरील हलके डाग कमी होऊ शकतात.

केळीच्या सालीचे छोटे तुकडे करून कुंडीतील मातीत पुरल्यास ते कुजून रोपांना आवश्यक पोषकद्रव्ये मिळण्यास मदत होते.