
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका घरात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला असून सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, टिकरापारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संजय नगर भागात ही घटना घडली. या परिसरात भाड्याच्या घरात राहणारे कुटुंब मृतावस्थेत आढळून आले. साजिद अली, त्यांची पत्नी राबिया आणि तीन मुले यांचे मृतदेह राहत्या घरात आढळून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.



























































