
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या लुटीच्या निषेधार्थ शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज नागपुरात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. रामनगरातील श्रीराम मंदिराजवळ झालेल्या या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. यावेळी रामरक्षा पठण, हनुमान चालिसा आणि महाआरतीने नागपूरनगरी दुमदुमली. या आंदोलनासाठी रामभक्त आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले.
प्रभू श्रीरामाच्या नावावर अमर्याद सत्ता भोगणाऱ्या भाजपच्या राजवटीतच अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीवर दरोडा पडल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे देशभरातील रामभक्तांमध्ये तीव्र संताप असून, या लुटीचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि संबंधित गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
























































