
>> अक्षय मोटेगावकर
[email protected]
व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट अशी वेगळी ओळख असणारी सोनल कौशल. तिच्या ‘द मोटर माऊथ’ या यूटय़ूब चॅनेलवरील पॉडकास्टस् म्हणजे वेगवेगळ्या विषयांची रंजक सफर आहेत.
आम्ही ‘एमबीए’ला पहिल्या वर्षाला असताना वेलकम इव्हेंटमध्ये आम्हाला आमच्या सीनिअर्सनी ‘अॅड मॅड शो’चे एक चॅलेंज दिले होते. आम्ही 5 जण होतो त्या ग्रुपमध्ये.
2 मुले आणि 3 मुली. त्यात एक टांझानियाचा स्ट्रटोन नावाचा कृष्णवर्णीय मुलगाही होता. आम्हाला ‘करेला ज्यूस’ (कारल्याचे ज्यूस) या प्रॉडक्टवर एक अॅड कॅम्पेन करायचे होते. त्या मुलाला घेऊन कसे करणार हा विचार करत असतानाच मला कल्पना सुचली. लहानपणी आपण ज्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या आवाज डब केलेल्या अॅडस् पाहायचो तसे काही केले तर? मुलांना आणि प्राध्यापक मंडळींना खूप आवडला तो आमचा परफॉर्मन्स.
मिमिक्री, व्हॉइस ओव्हर, डबिंग याची एक वेगळीच दुनिया असते. लहानपणी शाळेत असताना बरेचदा काही स्थानिक कलाकार येत असत जे वेगवेगळ्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे, रेल्वे किंवा गाडय़ांचे, चित्रपटही कलाकारांचे, नेत्यांचे आणि काही प्रसिद्ध व्यक्तींचे आवाज कादाखवत असत. ही आवाजाची एक कलाच पण या कलाकारांना पडद्यावरच्या कलाकारांप्रमाणे प्रसिद्धीचे भाग्य लाभत नाही, मात्र आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ते प्रकाशातही आणता येते आणि त्यांना त्यांची प्रसिद्धीदेखील मिळू शकते हा या युगाचा फायदा.
कपिल शर्माच्या एका एपिसोडपासून मोठय़ा प्रमाणात व्हायरल झालेली व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट सोनल कौशल. तिच्या पॉडकास्टची ओळख झाली आणि मनोरंजनाचा एक पेटारा उघडला गेला. तिने वयाच्या आठव्या वर्षीपासूनच व्हॉइस ओव्हर द्यायला सुरुवात केली. तिने स्वत लहान मुलांच्या कार्टून सीरिअल्सपैकी डोरेमॉन, छोटा भीम, लिटातले सिंघममधील बबली यासारख्या प्रसिद्ध पात्रांसाठी आवाज दिलेला आहे. त्यामुळे तिचा स्वतचा असा एक मोठा चाहता वर्ग आहे. आणि बडबडीची, वेगवेगळे आवाज कायाची आवड असणाऱया सोनलने स्वतच्या चॅनेलला ‘द मोटरमाऊथ शो’ असेच नाव दिले आहे. या सोनलने तिच्या चॅनेलवर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट्स, मिमिक्री आर्टिस्ट्स यांच्याबरोबर काही पॉडकास्टस् केले आहेत जे खूप लोकांना आवडले आहेत. तिच्या चॅनेलला 66 लाखांहून अधिक सबक्रायबर्स आहेत.
आपल्यापैकी बऱयाच जणांनी फेसबुक व्हिडीओज किंवा यूटय़ुबवर ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या टीमचा कपिल शर्मा शोचा भाग पाहिला असेल. त्यात जय विजय सचन या मिमिक्री आर्टिस्ट्सनी धमाल उडवून दिली होती. तो जेव्हा सोनलच्या शोमध्ये आला, त्याने सोनलबरोबर आवाजाची जुगलबंदी केली. आपण खळखळून हसतो. त्याने काआवाज मूळ कलाकारांबरोबर ताडून पाहतो आणि मग पुन्हा अवाक् होऊन ऐकतो आणि त्याचा आनंद लुटतो.
मिमिक्रीच्या पॉडकास्ट सेक्शनमध्ये तिने सहा पॉडकास्ट केले आहेत. त्यापैकी काही आवर्जून पाहण्यासारखे आहेत. जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर ही पण वडिलांसारखीच कलाकार. नकला करते, अभिनय करते तिच्यासोबतचा एपिसोड पण भन्नाट झाला आहे. सुमेध शिंदे जो ऋतिक रोशनच्या, आमीर खानच्या आवाजाची नक्कल करण्यामुळे प्रसिद्ध झाला त्याच्या सोबतच्या एपिसोडमध्येही फार मजा दिसून येते. रेडिओ जॉकी धीरज जो समय रैनाची हुबेहूब नक्कल करतो त्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये पण धीरज आणि सोनल धमाल उडवून देतात.
सोनलने या सगळ्या पॉडकास्टस्मध्ये कुठेही टोकदार प्रश्न विचारलेले नाहीयेत. ती त्यांच्यासोबत मोकळेपणाने गप्पा मारते, त्यांचा संघर्ष समजून घेते, तो किंवा ती कलाकार व्यक्ती म्हणून कशी आहे हे समजण्याचा प्रयत्न करते. त्यांचे रोजच्या जीवनातील अनुभव, संघर्ष आणि त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी यांचा मागोवा घेण्यात रस घेते.
व्हाईस ओव्हरच्या सेक्शनमध्येही असेच काही रंजक एपिसोड्स ऐकायला मिळतात. प्रा. मयूर व्यास जे गेल्या काही वर्षांपासून सुपरस्टार रजनीकांत यांच्यासाठी हिंदी भाषेत व्हाईस ओव्हर देतात. त्यांचा आवाज ऐकला की आपल्याला रजनीकांतच डोळ्यासमोर येतात. जपानी अॅनिमेशन क्षेत्रातील अत्यंत खटय़ाळ आणि खोडकर पात्र शिनचानसाठी व्हाईस ओव्हर देणाऱया आकाश आहुजा यांच्यासोबतच्या गप्पा देखील खूप गमतीदार झाल्या आहेत. मराठमोळ्या संकेत म्हात्रे (डोरेमान), मेघना एरंडे (निंजा हतोडी), प्रसाद बर्वे (व्हेगेटा) यांचे पॉडकास्टही नक्की ऐकावे असे आहेत.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)





























































