
इराणने जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळावर भीषण हल्ला केला असून यात दोन अमेरिकन सैनिक ठार, तर चार सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. इराणच्या थेट हल्ल्यात प्रथमच अमेरिकेच्या सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अमेरिकेची चांगलीच सटकली असून अमेरिकन लष्कराने इराणमधील विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एस्सवर इराणवरील कारवाईची माहिती दिली आहे.
राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार, आज संध्याकाळी ठीक 6 वाजता अमेरिकन सैन्याने इराणवर नवीन हवाई हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यावसायिक जहाजांना असलेला इराणचा धोका मोडून काढणे आणि जॉर्डनमध्ये अमेरिकन सैनिकांवर हल्ला करणाऱ्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला तात्काळ शिक्षा देणे, हा या हल्ल्यांचा उद्देश आहे, असे सेंट्रल कमांड आपल्या निवेदनात म्हटले आहे.
Today at 6 p.m. ET, U.S. forces began launching new airstrikes against Iran at the Commander in Chief’s direction. The strikes are designed to further degrade Iran’s ability to threaten commercial shipping in the Strait of Hormuz and swiftly punish Islamic Revolutionary Guard…
— U.S. Central Command (@CENTCOM) July 18, 2026
जॉर्डनमधील हल्ल्याचा घेतला बदला
दरम्यान, या कारवाईमुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणखी वाढला असून आखातात युद्धाचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत. शुक्रवारी इराणकडून जॉर्डनमधील मुवाफक साल्टी एअर बेसवर भीषण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या तळावर अमेरिकन आणि त्यांचे मित्रराष्ट्र दल तैनात होते. या हल्ल्यात अमेरिकेचे दोन सैनिक ठारे झाले, तर एक सैनिक अद्याप बेपत्ता आहे. इतर चार जखमी सैनिकांना जॉर्डनमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना आता डिस्चार्ज मिळाला आहे. किरकोळ जखमी झालेले इतर सैनिक पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत.
अमेरिकेने गमावले 16 सैनिक
इराणसोबतच्या थेट संघर्षात जीव गमावलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या आता 16 वर पोहोचली आहे. दरम्यान, अमेरिकन लष्कराने सुरक्षेच्या कारणास्तव इराणमधील नेमक्या कोणत्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे, याची माहिती अद्याप उघड केलेली नाही. तसेच या हल्ल्यात इराणचे किती नुकसान झाले याचा प्राथमिक अंदाज अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.



























































