FIFA World Cup 2026 – साकाची हॅटट्रिक, एम्बाप्पेचा वर्ल्ड रेकॉर्ड; इंग्लंड विरुद्ध फ्रान्स लढतीत पडला 10 गोलचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी रात्री उशीरा गतविजेता अर्जेंटिना आणि 2010 मधील विजेता स्पेनमध्ये रंगणार आहे. तत्पूर्वी तिसऱ्या स्थानासाठी इंग्लंड आणि फ्रान्समध्ये हार्ड रॉक स्टेडियमवर थरारक सामना रंगला. पहिल्या मिनिटापासून चुरशीच्या झालेल्या या सामन्यात तब्बल 10 गोलचा पाऊस पडला. इंग्लंडने हा सामना 6-4 अशा गोल फरकाने जिंकला. इंग्लंडच्या बुकायो साका याने गोलची हॅटट्रिक केली, तर फ्रान्सच्या एम्बाप्पेने दोन गोल करत फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 22 गोल करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

प्रतिष्ठा जपण्यासाठी मैदानात उतरलेल्या दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केली. इंग्लंडने सुरुवातीपासून फ्रान्सच्या गोलपोस्टवर धडका दिल्या. तिसऱ्याच मिनिटाला डेक्लन राइस याने गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एझरी कोन्सा, बुकायो साकाने दोन गोल करत ही आघाडी 4-0 अशी वाढवली.

फर्स्ट हाफमध्ये इंग्लंडचेच वर्चस्व राहिले. मात्र सेकंड हाफमध्ये फ्रान्सने कमबॅक केले. एम्बाप्पेने 48 व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला खाते उघडून दिले. त्यानंतर ब्रॅडली बारकोला याने 54 व्या आणि एम्बाप्पेने 66 व्या मिनिटाला गोल करत इंग्लंडची आघाडी 4-3 अशी कमी केली.

एक डाव जगज्जेतेपदाचा; अर्जेंटिना-स्पेन आज अंतिम फेरीत भिडणार, मेस्सीची शेवटची कीक की यमालचा उदय

सामना बरोबरीत येणार असे वाटत असताना साकाने इंग्लंडचा पाचवा आणि वैयक्तिक तिसरा गोल केला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत ओस्माने डेम्बेले याने (90+6) फ्रान्सकडून गोल केला. त्यानंतर ज्युड बेलिंगहॅम याने (90+8) इंग्लंडचा विजय निश्चित केला.

एम्बाप्पेचा वर्ल्ड रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केलेल्या 2 गोलसह किलियन एम्बाप्पेने इतिहास रचला. त्याचे विश्वचषक कारकिर्दीतील एकूण गोल आता 22 झाले आहेत. त्याने लिओनेल मेस्सीचा (21 गोल) विक्रम मोडला असून तो विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. यासोबतच या विश्वचषकात 10 गोल पूर्ण करत त्याने गोल्डन बूट पुरस्कारावरही दावा ठोकला आहे. आता एम्बाप्पेला मागे टाकण्यासाठी अंतिम लढतीत मेस्सीला गोलची हॅटट्रिक करावी लागेल. त्याच्या नावावर सध्या 8 गोल आहेत.

‘तो’ फोटो आयुष्यातील एक चमत्कारच ! – मेस्सी