पावसाळ्यात हिमाचलमधील ‘कोहाला खास’ गाव ठरू शकते तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा सुरू झाला की डोंगराळ भागात भूस्खलन आणि रस्ते बंद होण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे अनेकजण या काळात हिल स्टेशनला जाणे टाळतात. मात्र हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील कोहाला खास हे गाव पावसाळ्यातही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी शांत आणि सुंदर ठिकाण म्हणून ओळखले जाते. हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर आणि प्रसन्न वातावरणामुळे हे गाव पर्यटकांना वेगळाच अनुभव देते.

 

कोहाला खास हे गाव निसर्गप्रेमी, फोटोग्राफीची आवड असणारे आणि शहराच्या गोंगाटापासून दूर काही शांत क्षण घालवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम ठिकाण आहे.

 

हिरव्यागार दऱ्या आणि धुक्याने वेढलेले डोंगर
भातशेती आणि पारंपरिक हिमाचली ग्रामीण जीवन
नेचर वॉक आणि फोटोग्राफीसाठी सुंदर ठिकाणे
स्थानिक मंदिरे आणि शांत परिसर
होमस्टेमध्ये पारंपरिक हिमाचली खाद्यपदार्थांचा आस्वाद

 

कसे पोहोचाल?

कोहाला खास हे कांगडा जिल्ह्यात असून रस्तेमार्गे सहज पोहोचता येते.

रेल्वे: पठाणकोट हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक.

विमान: गग्गल (कांगडा) विमानतळ.

बस: दिल्लीसह अनेक शहरांतून व्होल्वो व इतर बससेवा उपलब्ध.

 

प्रवासात घ्या ही काळजी

रेनकोट, छत्री आणि वॉटरप्रूफ शूज सोबत ठेवा.
घसरड्या रस्त्यांवर सावधगिरी बाळगा.
खराब हवामानात उंच किंवा निर्जन भागात जाणे टाळा.
स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि परिसर स्वच्छ ठेवा.