
नीट पेपरफुटीमुळे उडालेला गोंधळ अद्याप संपलेला दिसत नाही. नीटची दुसऱ्यांदा परीक्षा घेतल्यानंतर आता निकालानंतरसुद्धा घोळ झाल्याचे समोर येत आहे. बीडमधील एका विद्यार्थिनीला परीक्षेत केवळ 87 गुण मिळाले आहेत. परंतु तिचा दावा आहे की, तिला अँसर की चेक केले तेव्हा 700 प्लस गुण मिळतील असा विश्वास होता. परंतु प्रत्यक्षात केवळ 87 गुण मिळाले आहेत. यामुळे तिला अश्रू अनावर झाले आहेत.
ज्ञानेश्वरी पवार असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती बीड जिह्यातील वडवण येथील आहे. ही विद्यार्थिनी टॉपरच्या यादीत होती. परंतु तिला 87 गुण मिळाल्याने तिच्या आईनेही आश्चर्य व्यक्त केले आहे. ओएमआर शीटमध्ये तफावत असल्याचे ज्ञानेश्वरीने म्हटले. माझ्या मुलीने 18 तास अभ्यास केला. तरीही तिला कमी मार्प पडल्याचे तिच्या आईने सांगितले.



























































