
>> आशुतोष बापट
[email protected]
कर्नाटक प्रांत हा वारसा स्थळांनी समृद्ध आहे. विविध राजवटींनी बांधलेली मंदिरे, धबधबे, वनसंपदा याचबरोबर या प्रांती असलेले किल्ले हेसुद्धा इथे बघण्यासारखे आहेत. कर्नाटकातील किल्ले आपल्या सह्याद्रीतील किल्ल्यांपेक्षा काहीसे निराळे आहेत. दगडांची एकावर एक रास रचली तर ती कशी दिसेल तसे काहीसे इथले किल्ले दिसतात. कर्नाटकच्या पूर्वभागात उंचच्या उंच डोंगरही नाहीत. त्यामुळे एखाद्या उंच टेकडीवर बांधलेले किल्ले इथे बघायला मिळतात. या किल्ल्यांमध्ये आकाराने सगळ्यात मोठा असलेला किल्ला म्हणजे चित्रदुर्गचा किल्ला. समुद्रसपाटीपासून 732 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला चालुक्य आणि होयसळ राजवटीत बांधला गेला. पुविजयनगरच्या सामंत असलेल्या नायक राजांनी या किल्ल्याचा 16 व्या शतकात विस्तार केला. बडप्पनायक, मदकरिनायक, कस्तुरीरंगप्पा, तिम्मन्नानायक यांसारख्या नायक राजांनी बळकट केला आणि विस्तारित केला. सात टेकडय़ांवर वसलेला हा किल्ला ‘कल्लिन कोटे’ (दगडी किल्ला) आणि ‘येलुसुत्तिना कोटे’ (सात वलयांचा किल्ला) या नावांनीही प्रसिद्ध आहे.
हा किल्ला आकाराने प्रचंड आहे. सात तटबंदी असलेल्या या किल्ल्याला 19 दरवाजे, 38 कमानी दरवाजे, 35 गुप्त दरवाजे, 4 अदृश्य दरवाजे, तर अनेक बुरुज आहेत. त्याशिवाय गुप्त मार्ग, पहारेकऱयांच्या चौक्या आणि मजबूत संरक्षण व्यवस्था, पावसाचे पाणी साठविण्यासाठी अत्यंत प्रगत जल व्यवस्थापन, धान्य कोठारे, तेलसाठे आणि अनेक लष्करी वास्तू यांनी हा किल्ला नटला आहे. सुमारे 211 वर्षे हा किल्ला नायकांच्या ताब्यात होता. त्या काळातला हा दक्षिण भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक समजला जात असे. हा किल्ला आधी हैदर अलीकडे होता. नंतर तो टिपूकडे आला.
किल्ल्याच्या सर्वात उंचावर हिडींबेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिर मोठे सुंदर. गाभाऱ्यात शिवलिंग. सभामंडपात एका कोपऱ्यात 5 फूट उंचीचा शिलालेख ठेवला आहे. हळे कन्नड लिपीतला हा शिलालेख नायक राजांनी दिलेल्या दानांचे वर्णन करतो.
या किल्ल्याशी निगडित असलेली प्रसिद्ध घटना ही ओणके ओब्बव्वा या धाडसी वीरांगनेची आहे. सन 1780 चा हा काळ. ओब्बव्वा ही किल्लेदार कलानायकाची बायको होती. हैदर अलीने किल्ल्यावर वेघातला होता. किल्ला काही त्याला दाद देईना. त्याच्या हेरांनी बातमी काकी, किल्ल्याच्या एका बाजूस एक अरुंद, गुप्त खिंड आहे, ज्यातून एका वेळी एकच व्यक्ती आत जाऊ शकेल. हैदर अलीचे सैनिक ही खिंडी वापरून किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. ओब्बव्वाला कळले की, हैदर अलीचे सैनिक त्या गुप्त खिंडीतून आत शिरत आहेत. ओब्बव्वाकडे शस्त्र नव्हते, पण तिच्याजवळ ‘ओणके’ म्हणजे मुसळ होते. तिने त्या मुसळाचा हत्यार म्हणून उपयोग केला. जस जसा एकेक शत्रू सैनिक त्या फटींतून आत येई, तेव्हा तेव्हा ती त्या ओणकेने म्हणजेच मुसळाने त्याला ठेचून ठार मारी आणि त्याचे शव बाजूला ढलून देई. असे करता करता तिने अनेक सैनिकांना ठार केले.
ओब्बव्वाचा पती तिला शोधायला आला तेव्हा त्याला शत्रूची अनेक प्रेते आणि त्यांच्यासमोर उभी असलेली हातात मुसळ घेतलेली, थकलेली, पण विजयी ओब्बव्वा दिसली. त्याने लगेच नगरे वाजवून सैन्याला सतर्क केले आणि किल्यावरच्या सैन्याने हैदरच्या सैन्यावर हल्ला चहैदरचा हा प्रयत्न विफल झाला. तिच्या या धैर्यामुळे किल्ल्यावरचा वेतुटला आणि हैदर अलीची योजना अपयशी ठरली. आजही त्या गुप्त खिंडीला ‘ओणके ओब्बव्वाना किंडी’ म्हणून ओळखले जाते. या विजयाला मात्र गालबोट लागले. ओब्बव्वाच्या आधीच किल्ल्यावर आलेल्या हैदरच्या सैनिकाने तिच्या पाठीत तलवार खुपसली.
आजही त्या वीरांगनेच्या पराक्रमाची कथा कर्नाटकात सांगितली जाते. ओब्बव्वा जणू महिषासुरमर्दिनी बनून हैदरच्या सैनिकांची कर्दनकाळ ठरली. एका स्त्राrने दाखवलेले असामान्य धाडस आणि त्यामुळे झालेला शत्रूचा पराभव याची साक्ष देणारी ती खिंड बघून आपला ऊर अभिमानाने भरून येतो. ओब्बव्वाचा पुतळा चित्रदुर्गच्या तहसील कार्यालयासमोर उभारला आहे. हातात मुसळ घेतलेली त्वेषाने लओब्बव्वा इथे दाखवली आहे. पावनखिंड लबाजीप्रभू देशपांडे असोत किंवा चित्रदुर्गवर खिंड लओब्बव्वा असो, ही माणसे स्वामीभक्ती आणि देशभक्तीचे असामान्य दर्शन घडवतात. आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या धन्याचे, त्याच्या किल्ल्यांचे रक्षण ही थोर मंडळी करतात. त्यांच्या कथा इतिहासात अमर होतात.






























































