
खासदारांच्या विलीनीकरणाला मान्यता मिळाली याबाबत माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणजे आचार्य विनोबा भावे नाहीत. त्यांना दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे तरी ते आचार्य विनोबा भावे नाहीयेत. मशालीवर निवडून आलेले 6 लोकं निर्लज्ज गद्दार तुम्ही 50 कोटीला विकत घेता.. यात कोणतं आलंय शौर्य नीतिमत्ता चांगलं आणि वाईट.. याचं उत्तर त्यांनी द्यावं असे म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
6 खासदारांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, आमच्या मशाल चिन्हावर हे लोक निवडून आलेले आहेत. या लोकांना पडलेली मतं ही मशालीला पडलेली मतं होती.. तुमच्या चोरलेल्या धनुष्यबाणाला ही मतं मिळाली नाहीत. आणि तुम्ही काय आम्हाला सांगताय.. एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल. दाढीवर हात फिरवून आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका.. तुमची जी काय आहे ती अमित शहाच्या पायाशी गहाण पडली आहे. मूळात तुम्हाला अब्रू नव्हतीच.. हे 6 लोकं जे आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे.. निर्लज्ज आहेत ते. गद्दार शब्द सुद्धा यांना कमी पडेल यांना असे म्हणत संजय राऊत यांनी गद्दार खासदारांवर शरसंधान साधले.
खासदारांचे विलीनीकरण हा लोकशाहीवरचा बलात्कार असून, या लोकशाहीचा खून झालेला आहे.. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहेत हे लोकशाहीचे सिरीयल रेपिस्ट आणि सिरीयल किलर आहेत. लाज वाटत नाही या लोकांना पक्ष फोडून 50 कोटींना लोकांना विकत घेताय. लोकांना खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही काही ठिकाणी लोक उपोषणाला बसली आहेत शिक्षणासाठी आणि तुम्ही काय मोठ्ठं शौर्य आम्हाला गाजवुन दाखवताय. तुम्ही लोकशाहीचे सिरीयल रेपिस्ट आणि सिरीयल किलर आहात असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि सरकारला टोला लगावला.


























































